अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे माहुल गावात ई-श्रम व मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न.
मुंबई: दिनांक ०८.०७.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे माहुल गावात ई-श्रमकार्ड व मोफत नेत्रतपासणी शिबीर आयोजित केले होते. शिबिरात स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व या शिबीरात एकूण १८० जन लाभार्थी ठरले. भाजप मच्छिमार सेल यांच्याविनंती अनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने वरील नमूद शिबीर यशस्वीरीत्या आयोजित करून गोरगरीब कोळी बंधू भगिनींना विनामूल्य सेवा प्रदान केली. माहुल गावातील स्थानिक श्री. प्रमोद कोळी व श्री. नारायण माहुलकर यांच्या पुढाकारा मुळे मोठया संख्येने स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिरास हजेरी लावली व शिबिराचा लाभ घेतला. केंद्र शासनाच्या या योजनेच्या द्वारा असंघटित कामगारांना जे ई-श्रम कार्ड धारक आहेत . त्यांना दर महिन्याला एक हजार रुपये त्यांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा होतात. तसेच वयाच्या साठ नंतर दर महा ३००० रुपये इतकी पेन्शन प्राप्त होते. प्रत्येक असंघटित कामगाराला सरंक्षण आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हेच या योजनेचे वैशिष्ट्य होय. सदर शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार...