मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर मातोश्री बालवाडी चकाला गावठाण (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.
मुंबई : दिनांक २८.१०.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्यावतीने मातोश्री बालवाडी चकाला गावठाण (अंधेरी पूर्व) येथे मोफत आभा कार्ड शिबीर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक व प्रमुख सल्लागार श्री. सुभाष कांता सावंत व शाखा प्रमुख नरेश कांता सावंत यांच्या विनंती अनुसार , अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने सदर शिबीर बालवाडी चकाला गावठाण (अंधेरी पूर्व) येथे राबिवले. श्री. सुभाष कांता सावंत व शाखा प्रमुख नरेश कांता सावंत यांच्या पुढाकाराने सदर शिबिरात स्थानिक रहिवाशांच्या प्रचंड प्रतिसादात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , ज्यात २५० हून अधिक लोक लाभार्थी ठरले होते. शिवसेना पक्षासाठी मेश्राम फाऊंडेशनतर्फे सदर शिबिर आयोजित करून गोरगरिबांना मोफत सेवा देण्यात आली. आभा कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली योजना अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नाग...