अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे वाळकेश्वर मध्ये शिबीर संपन्न
दिनांक २२.०६.२०२३ अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्यावतीने सुभाष चौक वाळकेश्वर येथे मोफत आयुष्मान भारत आरोग्य कार्ड व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शाखाप्रमुख शाखा क्रमांक २१९ श्री नितीन गावडे यांच्या विनंती अनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने सदर शिबीर हिंदी शाळा , सुभाष नगर वाळकेश्वर येथे राबिवले. स्थानिक रहिवाशांच्या प्रचंड प्रतिसादात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , ज्यात 3 ५० हून अधिक लोक लाभार्थी ठरले होते. शिवसेना पक्षासाठी अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे सदर शिबिरे आयोजित करून गोरगरिबांना मोफत सेवा देण्यात आल्या. आभा कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली योजना अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमितपणे नेत्र तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे मोफत नेत्रतपासणी नागरिकांसाठी उपयुक्त ठरली. या शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजूंना मोफत नेत्र तपासणी सेवा देण्यात आली. अश्विन मलिक मेश्राम नियमितपणे मुंबई विभागात विविध ठिकाणी शिक्षण , रोजगार , आरोग्य आणि महिला सक्षमी...