अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन तर्फे चकाला अंधेरी पूर्व मध्ये शिबीर संपन्न
अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनने दिनांक ३०.०९.२०२३ रोजी नटराज बँकक्वेट हॉल, चकाला , अंधेरी पूर्व येथे ' आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ' शिबिर आयोजित केले. या शिबिरात अनेक स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला , ज्यामुळे एकूण ३७५ लोकांना शिबिराचा लाभ घेता आले. या उपक्रमाची विनंती शिवसेना शाखाप्रमुख श्री. नरेश कांता सावंत यांच्या विनंतीनुसार झाली. त्यांनी विनंती केल्यानंतर , अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनने ही सेवा सुरु केली आणि या शिबिराचे यशस्वी आयोजन केले. आभा कार्ड हे केंद्र सरकारचे एक ओळखपत्र आहे जे भविष्यातील सर्व सेवांसाठी आवश्यक आहे. मेश्राम फाऊंडेशनचे तरुण तडफदार अध्यक्ष , अश्विन मलिक मेश्राम म्हणतात , " आमच्या फाऊंडेशनच्या धोरणानुसार , समाजाच्या सर्वांगातील दुर्बल घटकांना विनामूल्य सेवा देणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. फाऊंडेशन हे नियमित समाजकारणात सक्रिय असून , ते शिक्षण , रोजगार , आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची आयोजन करत असते. सदर शिबिराचे संकल्पना आणि आयोजन फाऊंडेशनचे अनुभवी कर्तबगार जनसंपर्क अधिकारी श्री. विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झा...