मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी' शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.
मुंबई: मेश्राम फाऊंडेशन तर्फे दिनांक २५ .११.२०२३ रोजी नटराज हॉल , चकाला (अंधेरी पूर्व) येथे मेगा ‘ आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी ' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला , ज्यामुळे एकूण २५० हून अधिक स्थानिकांना शिबिराचा लाभ घेता आला. या शिबिराची विनंती शिवसेना शाखा प्रमुख श्री. नरेश कांता सावंत , यांच्या कडून करण्यात आली व त्या अनुषंगाने मेश्राम फाऊंडेशनने ' आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड ' शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले. आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी , असे आवाहन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली आहे. या कार्डात रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळते व म्हणून आभा कार्ड या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आभा कार्डावर रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास , पूर्वी केलेल्या चाचण्या , पूर्वी केलेले उपचार