मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर मातोश्री बालवाडी चकाला गावठाण (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.
मुंबई : दिनांक २८.१०.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्यावतीने मातोश्री बालवाडी चकाला गावठाण (अंधेरी पूर्व) येथे मोफत आभा कार्ड शिबीर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
माजी नगरसेवक व प्रमुख सल्लागार श्री. सुभाष कांता सावंत व शाखा प्रमुख नरेश कांता सावंत यांच्या विनंती अनुसार, अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने सदर शिबीर बालवाडी चकाला गावठाण (अंधेरी पूर्व) येथे राबिवले. श्री. सुभाष कांता सावंत व शाखा प्रमुख नरेश कांता सावंत यांच्या पुढाकाराने सदर शिबिरात स्थानिक रहिवाशांच्या प्रचंड प्रतिसादात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात २५० हून अधिक लोक लाभार्थी ठरले होते.
शिवसेना पक्षासाठी मेश्राम
फाऊंडेशनतर्फे सदर शिबिर आयोजित करून गोरगरिबांना मोफत सेवा देण्यात आली. आभा कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली
योजना अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख आहे.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा
(आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा
उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली आहे. या
कार्डात रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळते व म्हणून
आभा कार्ड या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आभा कार्डावर रुग्णांचा संपूर्ण
वैद्यकीय इतिहास, पूर्वी केलेल्या चाचण्या,पूर्वी केलेले उपचार आदी यांची सर्व माहिती साठविली जाते.
आभा हेल्थ कार्डचे फायदे:
- उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही.
- आभा कार्डमध्ये रक्त गट, आजार, याची संपूर्ण माहिती असेल.
- या मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ
कार्ड बनविले जाणार आहे.
- ऑनलाइन उपचार, टेलिमेडिसीन, ई-फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड या
सुविधा मिळतील.
- वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल.
महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत ३ कोटी ४४ लाखाहून अधिक
नागरिकांनी आभा हेल्थ कार्डची नोंदणी केली आहे. महत्वाचे
म्हणजे आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून सुद्धा वापरता येते.
आभा कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- आधार लिंक मोबाइल क्रमांक
मेश्राम फौंडेशन नियमितपणे
मुंबई विभागात विविध ठिकाणी शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात मोफत सेवा प्रदान करतात. कर्तुत्ववान संस्थापक अध्यक्ष
अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, " केंद्र शासनाच्या योजना गरीब
जनतेला वेळोवेळी विनामूल्य प्रदान करणे हेच आमच्या
फौंडेशनचे उद्दिष्ट होय.
श्री अश्विन मलिक मेश्राम हे
सर्व सामाजिक उपक्रमे स्वकमाईतून राबिवतात म्हणून समाजातील मान्यवर त्यांचे
मनोसोक्त कौतुक करतात व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत विविध मंचावर पुरस्कार
देऊन त्यांना सन्मानित करतात. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी
मेश्राम फाऊंडेशनच्या अविरत उत्कृष्ट कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले व पुढील शिबिरे राबविण्यास नम्र विनंती केली.
मेश्राम फाऊंडेशनचे अनुभवी व
कार्यक्षम जनसंपर्क अधिकारी श्री. विजय
डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे संपूर्ण नियोजन यशस्वीरित्या करण्यात आले.
Comments
Post a Comment