अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे लक्ष्मी नगर, महालक्ष्मी गुफेनजीक अंधेरी पूर्व येथे मेगा शिबीर संपन्न.

दिनांक २४.०५.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे  लक्ष्मी नगर ,महालक्ष्मी गुफेनजीक अंधेरी (पूर्व) येथे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. शिबिरात स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व  एकूण २२० जन लाभार्थी ठरले.


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री उत्तम शिंदे – उप शाखाप्रमुख शाखा क्रमांक 76 यांच्या विनंतीअनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने वरील नमूद मेगा शिबीर यशस्वीरीत्या आयोजित करून गोरगरीब गरजूजनतेला विनामूल्य सेवा प्रदान केली.केंद्र शासनाच्या आभा कार्डात लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते व क्युअर कोड स्कॅन केल्याने पुनः प्राप्त करता येते.केंद्र शासनाचे आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून  पण वापर करता येते.

सदर शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजू स्थानिकांनामोफत नेत्रतपासणी सेवा प्रदान करण्यात आली.विनामूल्य सेवा प्राप्त झाल्यामुळे प्रत्येक लाभार्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव स्पष्टपणे दिसून आला.तसेच येसारवी हॉस्पिटल गोरेगाव पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने विमुल्य आरोग्य तपासणी सुद्धा आयोजित केली होती ज्यामध्ये मधुमेह,रक्तदाब,बीएमआई तसेच अनुभवी डॉक्टरांशी सल्लामसलत अशा विविध सुविधा प्रदान करण्यात आल्या.

फौंडेशनचे कर्तृत्ववान संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मतानुसार, "समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विनामूल्य सेवा आणि सुविधा पोहोचवणे हेच माझ्या फौंडेशनचे उद्दिष्ट होय".अश्विन मलिक मेश्राम नियमितपणे शिक्षण,रोजगार,आरोग्य व महिलासक्षमीकरणात केंद्र शासनाचे विविध उपक्रम अनेकराजकीय पक्षांसोबत राबवित असतात व जनतेला विनामूल्य सेवा प्रदान करतात.

शिबिरास स्थानिक आमदार श्रीमती ऋतुजा रमेश लटके यांनी भेट देऊन अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनच्या नियमित होत असलेल्या  उल्लेखनीय कामगिरीची स्तुती केली व समाधान व्यक्त केले.

सदर शिबिराचे नियोजन फौंडेशनचे तडफदार कार्यसम्राट जन संपर्क अधिकारी - श्री विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

Comments

Popular posts from this blog

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे चिखलवाडी येथे आभा कार्ड शिबीर संपन्न

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.