अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे ई-श्रम व मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न.

दिनांक १९.०६.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे मरोळ पाईपलाईन,अंधेरी पूर्व येथे ई-श्रमकार्ड  व मोफत नेत्रतपासणी  शिबीर आयोजित केले होते. शिबिरात स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व  एकूण २५० जन लाभार्थी ठरले.

शिवसेना अंधेरी विभाग संघटक श्री सुभाष सावंत यांच्याविनंती अनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने वरील नमूद मेगा शिबीर यशस्वीरीत्या आयोजित करून गोरगरीब गरजूजनतेला विनामूल्य सेवा प्रदान केली. मोठ्या संख्येने स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिरास हजेरी लावली व शिबिराचा लाभ घेतला.


केंद्र शासनाच्या या योजनेच्या द्वारा असंघटित कामगारांना जे ई-श्रम कार्ड  धारक आहेतत्यांना दर महिन्याला एक हजार रुपये त्यांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात जमा होतात.तसेच वयाच्या साठी नंतर दर महा ३००० रुपये इतकी पेन्शन प्राप्त होते.

प्रत्येक असंघटित कामगाराला सरंक्षण आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हेच या योजनेचे वैशिष्ट्य होय. सदर शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजू स्थानिकांनामोफत नेत्रतपासणी सेवा प्रदान करण्यात आली.

डॉक्टरांच्या मते प्रत्येक माणसाने वर्षातून किमान दोनदा डोळे तपासून घेणे आवश्यक आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डोळ्यांची नियमित तपासणी करणे गरजेचे असते व फौंडेशन नियमित ही सेवा प्रदान करत असते.

फौंडेशनचे कार्यसम्राट संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते,"समाजाच्या शेवटच्या दुर्बल घटकांपर्यंत विनामूल्य सेवा आणि सुविधा प्रदान करणे हेच आमच्या फौंडेशनचे उद्दिष्ट होय". अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन नियमितपणे शिक्षण, रोजगार, आरोग्य व महिलासक्षमीकरणात केंद्र शासनाचे विविध उपक्रम अनेकराजकीय पक्षांसोबत राबवित असतात व जनतेला विनामूल्य सेवा प्रदान करतात.

सदर शिबिराचे संपूर्ण नियोजन फौंडेशनचे  अनुभवी व कार्यक्षम जन संपर्क अधिकारी -श्री विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

Comments