अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे घाटकोपरमध्ये मेगा शिबीर संपन्न.

दिनांक २१.०६.२०२३ आंतरराष्ट्रीय योग दिनच्यानिमित्त अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्या वतीने चिरागनगर घाटकोपर पश्चिम येथे मोफतआयुष्मान भारत आरोग्य कार्डमोफत ई-श्रम कार्ड व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

माजी नगरसेविका रितू तावडे यांच्या विनंती अनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने सदर शिबीर घांची हॉलचिराग नगर घाटकोपर पश्चिम येथे राबिवले. स्थानिक रहिवाशांच्या प्रचंड प्रतिसादात  या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात ५५० हून अधिक लोक लाभार्थी ठरले होते. भारतीय जनता पार्टी यांच्यासाठी अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे सदर शिबिरे आयोजित करून गोरगरिबांना मोफत सेवा देण्यात आल्या.


या शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजूंना मोफत नेत्र तपासणी सेवा देण्यात आली.अश्विन मलिक मेश्राम नियमितपणे मुंबई विभागात विविध ठिकाणी शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात मोफत सेवा देतात. संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या म्हणण्यानुसार, " केंद्र शासनाच्या योजना गरीब लोकांना विनामूल्य प्रदान करणे हेच आमच्या फौंडेशनचे उद्दिष्ट होय"



स्थानिक आमदार राम कदम घाटकोपर विधानसभा यांनी शिबिरास भेट दिली व  अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्या उत्कृष्ट कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनचे कार्यसम्राट जनसंपर्क अधिकारी विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले  . 

Comments