अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने तर्फे चकाला अंधेरी पूर्व मध्ये शिबीर संपन्न
अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने दिनांक १६.०६.२०२३ रोजी चकाला अंधेरी पूर्व
येथे आयुष्यमान भारत हेअल्थ कार्ड आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते.
ह्या शिबीरमध्ये स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे सहभाग
घेतला व एकूण 385 जन लाभार्थी ठरले.
शिवसेना शाखाप्रमुख श्री. नरेश सावंत यांच्याविनंती अनुसार, अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने मेगा शिबीर यशस्वीरीत्या
आयोजित करून गरजू लोकांसाठी विनामूल्य सेवा प्रदान केली. शिबीरात मोठ्या संख्येने
स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिरास हजेरी लावली आणि शिबिराचा लाभ घेतला.
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या केंद्र शासनाच्या आभा
कार्डात लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते आणि
क्युअर कोड स्कॅन केल्याने पुन्हा प्राप्त करता येते. केंद्र शासनाचे आभा कार्ड हे
ओळखपत्र म्हणून वापरता येते. भविष्यात आभा कार्ड धारकाला कोणतेही कागदपत्रे घेऊन
जाण्याची आवश्यकता नाही.
सदर शिबीरात वी.ये.मयेकर
ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजू स्थानिकांना मोफत नेत्र तपासणी सेवा प्रदान करण्यात
आली. डॉक्टरांच्या मते प्रत्येक माणसाने वर्षातून किमान दोनदा डोळे तपासून घेणे
आवश्यक आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डोळ्यांची नियमित तपासणी करणे गरजेचे असते
आणि अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन नियमितपणे ही सेवा प्रदान करत आहे.
फौंडेशनचे उद्यमी आणि कार्यकुशल संस्थापक
अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, "समाजाच्या शेवटच्या दुर्बल घटकांपर्यंत विनामूल्य सेवा आणि
सुविधा पोहोचवणे हेच आमच्या फौंडेशनचे उद्दिष्ट आहे".
अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन नियमितपणे शिक्षण, रोजगार, आरोग्य व महिला सक्षमीकरणात आणि केंद्र शासनाचे विविध उपक्रम अनेक राजकीय पक्षांसोबत राबवित असतात आणि जनतेला विनामूल्य सेवा
प्रदान करतात.
सदर शिबीराचे संपूर्ण नियोजन फौंडेशनचे कार्यक्षम जन संपर्क अधिकारी - श्री विजय डोईफोडे
यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
.jpeg)



.jpeg)


.jpeg)
Comments
Post a Comment