अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन तर्फे दिनांक १२.०९.२०२३ रोजी ताड़देव (दक्षिण मुंबई) येथे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीराचे आयोजन.*

 मुंबई: अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन तर्फे दिनांक १२.०९.२०२३ रोजी ताड़देव (दक्षिण मुंबई) येथे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीराचे आयोजन केले होते. ह्या शिबीरामध्ये स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व एकूण ४५० जन लाभार्थी ठरले.

शिवसेना महिला शाखाप्रमुख (२१५) श्रीमती अंकिता  मयेकर व  युवा उप विभाग प्रमुख (मलबार हिल विधानसभा) श्री. डेरेक परेरा यांच्याविनंती अनुसारअश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनने शिबीर यशस्वीरीत्या आयोजित करून गरजू लोकांसाठी विनामूल्य सेवा प्रदान केली. या शिबीरात स्थानिक जनसंख्येने खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिरास हजेरी लावली आणि शिबिराचा लाभ घेतला.

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत हेल्थ कार्डात लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते आणि क्युअर कोड स्कॅन केल्याने पुन्हा प्राप्त करता येते. केंद्र शासनाचे आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरता येते. भविष्यात आभा कार्ड धारकाला कोणतेही कागदपत्रे घेऊन जाण्याची आवश्यकता नाही.

फाऊंडेशनचे कार्यसम्राट संस्थापक अध्यक्ष श्री. अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, "समाजाच्या शेवटच्या दुर्बल घटकांपर्यंत विनामूल्य सेवा आणि सुविधा पोहोचवणे हेच आमच्या फौंडेशनचे उद्दिष्ट आहे".

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन नियमितपणे शिक्षणरोजगारआरोग्य व महिला सक्षमीकरणात आणि  केंद्र शासनाचे विविध उपक्रम अनेक राजकीय पक्षांसोबत राबवित असतात आणि जनतेला विनामूल्य सेवा प्रदान करतात.

सदर शिबीराचे संपूर्ण नियोजन फाऊंडेशनचे तडफदार व अनुभवीकार्यक्षम जनसंपर्क अधिकारी - श्री विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.



Comments

Popular posts from this blog

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी' शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.