अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे अंधेरी पूर्वेत आभा कार्ड व मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न
मुंबई : दिनांक १७.०५.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने चकाला अंधेरी पूर्व येथे आयुष्यमान हेअल्थ कार्डचे मेगा शिबीर तसेच मोफत नेत्र तपासणी आयोजित केले होते.
सदर शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने
गरजू स्थानिकांना मोफत नेत्रतपासणी सेवा प्रदान करण्यात आली.प्रत्येक
लाभार्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव स्पष्टपणे दिसून आला.
फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या
मतानुसार,"समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विनामूल्य सेवा आणि सुविधा
पोहोचवणे हेच माझ्या फौंडेशनचे उद्दिष्ट होय".
स्थानिक आमदार श्रीमती ऋतुजा लटके यांनी शिबिरास भेट देऊन
अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनच्या भरीव कामगिरीची स्तुती केली व फौंडेशन मार्फत होत
असलेल्या नियमित समाजसेवेबद्दल समाधान व्यक्त केले.तसेच शिबिरास अंधेरी विधानसभेचे
संघटक श्री सुभाष सावंत यांनी आवर्जून भेट दिली.
सदर शिबिराचे नियोजन फौंडेशनचे कार्यसम्राट जन संपर्क
अधिकारी -श्री विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
.jpeg)


.jpeg)

Comments
Post a Comment