[महत्वाचे]अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे मरोळमध्ये मेगा शिबीर दि. २४ मे २०२३ रोजी संपन्न.

मुंबई प्रतिनिधी: दि. २४.०५.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे  सिद्धिविनायक मंदिर मरोळ पाईप लाईन, अंधेरी (पूर्व) येथे आयुष्यमान भारत हेअल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरामध्ये स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे शिबिरामध्ये  सहभाग घेतला व  एकूण ३९४ जन  या शिबिरामद्धे लाभार्थी ठरले.

माजी नगरसेवक व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा संघटक श्री. सुभाष सावंत यांच्या विनंतीनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने वरील मेगा शिबीराचे  आयोजन केले  यशस्वीरीत्या पार पाडून गोरगरीब जनतेला विनामूल्य सेवा प्रदान केली.

केंद्र शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या आभा कार्डामध्ये लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित केली जाते व क्युआर कोड स्कॅन करताच लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती प्राप्त करता येते. आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून पण वापर करता येतो.

सदर शिबिरात वी.ये. मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजू स्थानिकांना मोफत नेत्रतपासणी सेवा प्रदान करण्यात आली. प्रत्येक लाभार्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव स्पष्टपणे दिसून आला.

फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. अश्विन मलिक मेश्राम यांच्या मतानुसार,"समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत विनामूल्य सेवा आणि सुविधा  सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच आमच्या फौंडेशनचे उद्दिष्ट होय".

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन हे नियमितपणे शिक्षण, रोजगार, आरोग्य व महिला सक्षमीकरणात केंद्र शासनाकडून जाहीर केलेल्या योजना हे विविध राजकीय पक्षांसोबत राबवित असतात व सामान्य जनतेला विनामूल्य केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या सेवा प्रदान करीत करतात.

सदर शिबिराचे नियोजन फौंडेशनचे कार्यसम्राट जन संपर्क अधिकारी श्री विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.


Comments

Popular posts from this blog

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे ई-श्रम व मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न.

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे चिखलवाडी येथे आभा कार्ड शिबीर संपन्न