अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे मरोळ मध्ये रोजी दि. ०९.०६.२०२३ भव्य शिबीर संपन्न.

 दिनांक ०९.०६.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनतर्फे मरोळ पाईप लाईन,अंधेरी पूर्व येथे आयुष्यमान भारत हेअल्थ कार्ड,मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत मोती बिंदू शस्त्रक्रियेचे नोंदणीकरण अशी एकूण तीन शिबिरे आयोजित केले होते.

शिबिरात स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व  एकूण ५३५ जन लाभार्थी ठरले. तसेच विनमूल्य मोतीबिंदू शास्त्रक्रियाकरिता सुमारे ५० जेष्ठ नागरिकांनी नोंदणी केली.

शिवसेना अंधेरी विधानसभा संघटक श्री सुभाष कांता सावंत यांच्याविनंती अनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने वरील नमूद मेगा शिबीर यशस्वीरीत्या आयोजित करून गोरगरीब गरजूजनतेला विनामूल्य सेवा प्रदान केली.सदर वसाहतीतअत्यंत गरीब आणि दुर्बल जनतेचे वास्तव्याअसून त्यात नागरिकांना विनामूल्य सेवेची नितांत गरज होती.मोठ्या संख्येने स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिरास हजेरी लावली व शिबिराचा लाभ घेतला.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या या केंद्र शासनाच्या आभा कार्डात लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते व क्युअर कोड स्कॅन केल्याने पाहिजे तेव्हा पुनः प्राप्त करता येते. केंद्र शासनाचे आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून  पण वापर करता येते.

सदर शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजू स्थानिकांनामोफत नेत्रतपासणी सेवा प्रदान करण्यात आली.डॉक्टरांच्या मते प्रत्येक माणसाने वर्षातून किमान दोनदा डोळे तपासून घेणे आवश्यक आहे.मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डोळ्यांची नियमित तपासणी करणे गरजेचे असते व फौंडेशन नियमित ही सेवा प्रदान करत असते.

फौंडेशनचे तरुण तडफदार कार्यसम्राट संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मतानुसार,"समाजाच्या शेवटच्या दुर्बल घटकांपर्यंत विनामूल्य सेवा आणि सुविधा पोहोचवणे हेच माझ्या फौंडेशनचे उद्दिष्ट होय".

अश्विन मलिक मेश्राम नियमितपणे शिक्षण, रोजगार, आरोग्य व महिला सक्षमीकरणात केंद्र शासनाचे विविध उपक्रम अनेकराजकीय पक्षांसोबत राबवित असतात व जनतेला विनामूल्य सेवा प्रदान करतात.

सदर शिबिराचे संपूर्ण नियोजन फौंडेशनचे हरहुन्नरी जन संपर्क अधिकारी - श्री विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

Comments

Popular posts from this blog

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे ई-श्रम व मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न.

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे चिखलवाडी येथे आभा कार्ड शिबीर संपन्न