अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे चकाला येथे आभा कार्ड शिबीर संपन्न
दिनांक २५.०८.२०२३ अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्यावतीने चकाला (अंधेरी पूर्व) येथे मोफत आभा कार्ड शिबीर संपन्न व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शाखा प्रमुख श्री नरेश कांता सावंत यांच्या विनंती अनुसार , अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने सदर शिबीर चकाला (अंधेरी पूर्व) येथे राबिवले. श्री नरेश कांता सावंत यांच्या पुढाकाराने सदर शिबिरात स्थानिक रहिवाशांच्या प्रचंड प्रतिसादात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , ज्यात ४०० हून अधिक लोक लाभार्थी ठरले होते. शिवसेना पक्षासाठी अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे सदर शिबिर आयोजित करून गोरगरिबांना मोफत सेवा देण्यात आली. आभा कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली योजना अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमितपणे नेत्र तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे मोफत नेत्रतपासणी नागरिकांसाठी उपयुक्त ठरली. सदर शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजूंना मोफत नेत्र तपासणी सेवा देण्यात आली. अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन नियमितपणे मुंबई विभागात विव...