अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे चकाला येथे आभा कार्ड शिबीर संपन्न
दिनांक २५.०८.२०२३ अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्यावतीने चकाला (अंधेरी पूर्व) येथे मोफत आभा कार्ड शिबीर संपन्न व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना शाखा प्रमुख श्री नरेश कांता सावंत यांच्या विनंती अनुसार, अश्विन मलिक
मेश्राम फौंडेशनने सदर शिबीर चकाला (अंधेरी पूर्व) येथे राबिवले. श्री नरेश कांता सावंत यांच्या
पुढाकाराने सदर शिबिरात स्थानिक
रहिवाशांच्या प्रचंड प्रतिसादात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात ४०० हून अधिक लोक लाभार्थी ठरले होते. शिवसेना
पक्षासाठी अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे सदर शिबिर आयोजित करून गोरगरिबांना
मोफत सेवा देण्यात आली.
आभा कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली योजना
अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमितपणे नेत्र तपासणी
करून घेणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे मोफत नेत्रतपासणी नागरिकांसाठी उपयुक्त ठरली.
सदर शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजूंना मोफत नेत्र
तपासणी सेवा देण्यात आली. अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन नियमितपणे मुंबई
विभागात विविध ठिकाणी शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात मोफत
सेवा प्रदान करतात.
संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, " केंद्र शासनाच्या योजना गरीब जनतेला वेळोवेळी
विनामूल्य प्रदान करणे हेच आमच्या फौंडेशनचे उद्दिष्ट होय"अश्विन मलिक
मेश्राम हे सर्व सामाजिक उपक्रमे स्वकमाईतून राबिवतात म्हणून समाजातील मान्यवर
त्यांचे मनोसोक्त कौतुक करतात व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल विविध पुरस्कार
देऊन त्यांना सन्मानित करतात.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्या अविरत उत्कृष्ट
कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले व पुढील शिबिरे राबविण्यास
नम्र विनंती केली. अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनचे अनुभवी व कार्यक्षम जनसंपर्क अधिकारी श्री. विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे संपूर्ण नियोजन
यशस्वीरित्या करण्यात आले.
Comments
Post a Comment