अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे नेपियन सी रोड येथे आभाशिबीर संपन्न
मुंबई: दिनांक २९.७.२०२३ अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्यावतीने सिमला नगर येथील आंबेडकर शाळेत नेपियन सी रोड येथे मोफत आयुष्मान भारत आरोग्य कार्ड व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना शाखाप्रमुख शाखा क्रमांक २१९ श्री नितीन गावडे
यांच्या विनंती अनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने सदर शिबीर राबिवले. स्थानिक
रहिवाशांच्या प्रचंडप्रतिसादात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
ज्यात 400 हून अधिक लोक लाभार्थी ठरले होते. शिवसेना पक्षासाठी
अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे सदर शिबिरे आयोजित करून गोरगरिबांना मोफत सेवा
देण्यात आल्या.
आभा कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून
सुरु झालेली योजना अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख आहे.मधुमेह असलेल्या रुग्णांनी
नियमितपणे नेत्र तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे मोफत नेत्रतपासणी
नागरिकांसाठी उपयुक्त ठरली.
या शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने
गरजूंना मोफत नेत्र तपासणी सेवा देण्यात आली.अश्विन मलिक मेश्राम नियमितपणे मुंबई
विभागात विविध ठिकाणी शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात मोफत सेवा देतात.
संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते,
" समाजाच्या शेवटच्या
घटकापर्यंतकेंद्र शासनाच्या योजना वेळोवेळी विनामूल्य प्रदान करणे हेच आमच्या
फौंडेशनचे उद्दिष्ट होय"
शिवसेना विभाग प्रमुख दिलीप नाईक व त्यांच्या
कार्यकर्त्यांनी शिबिरास भेट दिली व अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्या निरंतर
होणाऱ्याउत्कृष्ट कामाचे मनसोक्तकौतुक करून भविष्यात दक्षिण मुंबई विभागात पुढील शिबिरे राबविण्यास विनंती केली.
अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनचे कार्यसम्राट जनसंपर्क अधिकारी श्री विजय
डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे
यशस्वी आयोजन करण्यात आले.
Comments
Post a Comment