अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन तर्फे दि. ११.०९.२०२३ रोजी मुलुंड येथे मोफत आभा कार्ड शिबीर व शरीर तपासणी शिबिर संपन्न

 मुंबई : दिनांक ११.०९.२०२३ अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्यावतीने मुलुंड येथे मोफत आभा कार्ड शिबीर व शरीर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


सदर शिबिर, सलुन ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र (मुलुंड विभाग) यांनी संत शिरोमनी सेना महाराज यांच्या ५२९ व्या पुण्यतिथि निमित्त अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन यांना विनंती करून आयुष्य भारत हेल्थ कार्ड शिबिर व  फोरटीस हॉस्पिटल, मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमानाने वरील नमूद शिबिर चंदन बाग स्कूल, मुलुंड पश्चिम येथे राबविले.

श्री संदीप चव्हाण –  कार्याध्यक्ष व श्री. संतोष  ठाकूर – सचिव व सलुन ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र (मुलुंड विभाग) चे सर्व पदाधिकारी  यांच्या पुढाकाराने व विशेष प्रयत्नाने सदर शिबिर पार पडले.

शिबिरात  स्थानिक रहिवाशांच्या प्रचंड प्रतिसादात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेज्यात ४०० हून अधिक लोक लाभार्थी ठरले होते. अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे सदर शिबिर आयोजित करून गोरगरिबांना मोफत सेवा देण्यात आली.


आभा कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली योजना अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख आहे. अश्विन मलिक मेश्राम फौंडेशन नियमितपणे मुंबई विभागात विविध ठिकाणी शिक्षणरोजगारआरोग्य आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात मोफत सेवा प्रदान करतात.


कार्यसम्राट संस्थापक अध्यक्ष  श्री. अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, " केंद्र शासनाच्या योजना गरीब जनतेला वेळोवेळी विनामूल्य प्रदान करणे हेच आमच्या फौंडेशनचे उद्दिष्ट होय. "अश्विन मलिक मेश्राम हे सर्व सामाजिक उपक्रमे स्वकमाईतून राबिवतात आणि त्यामुळेच आमचे फाऊंडेशन निराळे व अद्वितीय आहे.  

सबब  समाजातील मान्यवर लोक  अश्विन मलिक मेश्राम यांचे मनोसोक्त कौतुक करतात व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत विविध मंचावर त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करतात.

अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनचे अनुभवीकार्यक्षम आणि कर्तुत्ववान  जनसंपर्क अधिकारी श्री. विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे संपूर्ण नियोजन यशस्वीरित्या करण्यात आले.

 

 

Comments

Popular posts from this blog

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे ई-श्रम व मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न.

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे चिखलवाडी येथे आभा कार्ड शिबीर संपन्न