अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे सिमला हाऊसच्या महागणपती मंडळात भव्य आभा शिबीर संपन्न

मुंबई: दिनांक २३.०९.२०२३ अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्यावतीने  सिमला नगर येथील सिमला हाऊसच्या महागणपती मंडळात नेपियन सी रोड येथे मोफत आयुष्मान भारत आरोग्य कार्ड व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मिलन क्रीडा मंडळाचे संथापक श्री. प्रशांत जाधव यांच्या विनंती अनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने सदर शिबीर राबिवले. स्थानिक रहिवाशांच्या प्रचंड प्रतिसादात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेज्यात २५० हून अधिक लोक लाभार्थी ठरले होते. मिलन क्रीडा मंडळासाठी अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे सदर शिबिरे आयोजित करून गोरगरिबांना मोफत सेवा देण्यात आल्या.

आभा कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली योजना अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमितपणे नेत्र तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे मोफत नेत्रतपासणी नागरिकांसाठी उपयुक्त ठरली.

या शिबिरात वी ये मयेकर ऑप्टिशियन्स यांच्या सहकार्याने गरजूंना मोफत नेत्र तपासणी सेवा देण्यात आली. अश्विन मलिक मेश्राम नियमितपणे मुंबई विभागात विविध ठिकाणी शिक्षणरोजगारआरोग्य आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात मोफत सेवा देतात.

संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, समाजाच्या खेरच्या घटकापर्यंत केंद्र शासनाच्या अश्या योजना वेळोवेळी निशुल्क प्रदान करणे, हे आमच्या फाउंडेशनचे ध्येय आहे.

मिलन क्रीडा मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिबिरास भाग घेतला व अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्या निरंतर होणाऱ्या उत्कृष्ट कामाचे मनसोक्त कौतुक करून भविष्यात दक्षिण मुंबई विभागात पुढील शिबिरे राबविण्यास विनंती केली.

अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनचे कार्यसम्राट जनसंपर्क अधिकारी श्री. विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे  यशस्वी आयोजन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे ई-श्रम व मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न.

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे चिखलवाडी येथे आभा कार्ड शिबीर संपन्न