मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी' शिबीर चकाला अंधेरी पूर्व येथे संपन्न.

मुंबई: मेश्राम फाऊंडेशनने दिनांक २३.१०.२०२३ रोजी चकाला अंधेरी पूर्व येथे मेगा आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणीशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलाज्यामुळे एकूण २५० हून अधिक स्थानिकांना शिबिराचा लाभ घेता आला.  

या शिबिराची विनंती शिवसेना शाखा प्रमुख श्री. नरेश कांता सावंतयांच्या कडून करण्यात आली व त्या अनुषंगाने मेश्राम फाऊंडेशनने 'आयुष्यमान भारत हेल्थ कार्डशिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावीअसे आवाहन देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली आहे. या कार्डात रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळते व म्हणून आभा कार्ड या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आभा कार्डावर रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय इतिहासपूर्वी केलेल्या चाचण्या,पूर्वी केलेले उपचार आदी यांची सर्व माहिती साठविली जाते.

आभा हेल्थ कार्डचे फायदे:

  • उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवालकागदपत्रे घेऊन जाण्याची गरज नाही.
  • आभा कार्डमध्ये रक्त गटआजारयाची संपूर्ण माहिती असेल.
  • या मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे.
  • ऑनलाइन उपचारटेलिमेडिसीनई-फार्मसीपर्सनल हेल्थ रेकॉर्ड या सुविधा मिळतील.
  • वैद्यकीय अहवाल मेडिकल इन्शुरन्स कंपनीला शेअर करता येईल.

महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत ३ कोटी ४४ लाखाहून अधिक नागरिकांनी आभा हेल्थ कार्डची नोंदणी केली आहे.  महत्वाचे म्हणजे आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून सुद्धा वापरता येते.

आभा कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • आधार लिंक मोबाइल क्रमांक

मेश्राम फाऊंडेशनचे उदयमी अध्यक्षश्री. अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, "समाजाच्या सर्वांगातील दुर्बल घटकांना पर्यन्त विनामूल्य सेवा देणे हेच मेश्राम फाऊंडेशनचे उद्दीष्ट आहे.

मेश्राम फाऊंडेशन अश्या प्रकारचे शिबिरे नियमित पणे मुंबईत सर्व ठिकाणी विविध राजकीय पक्षासोबत अश्याच प्रकारचे सामाजिक उपक्रम श्री. अश्विन मलिक मेश्राम स्व कमाईतून राबवत असतात.

मेश्राम फाऊंडेशन हे नियमित समाजकारणात सक्रिय असूनते शिक्षणरोजगारआरोग्य व महिलासक्षमीकरण करणासाठी वेगवेगळ्या केंद्र शासनाच्या योजना आयोजित करीत असतात. 


राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अनेक वेळा मेश्राम फाऊंडेशनच्या अविरत समाजकारणाचे कौतुक करत फाऊंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. श्री. नरेश कांता सावंत यांनी मेश्राम फाऊंडेशनच्या उल्लेखनीय कार्याची स्तुति करत पुढील शिबिरांची मागणी मेश्राम फाऊंडेशनला केली आहे.

सदर शिबिराची संकल्पना आणि आयोजन फाऊंडेशनचे अनुभवी व तडफदारजनसंपर्क अधिकारी श्री. विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली जेणेकरून सदर शिबिर अत्यंत यशस्वी रित्या पार पडले.

Comments

Popular posts from this blog

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड व मोफत नेत्र तपासणी' शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.

अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन तर्फे दिनांक १२.०९.२०२३ रोजी ताड़देव (दक्षिण मुंबई) येथे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीराचे आयोजन.*