अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन तर्फे मरोळ पाइप लाईन अंधेरी पूर्व येथे आभा कार्ड शिबीर संपन्न

अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनने दिनांक ०२.१०.२०२३ रोजी गांधी जयंती आणि श्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिद्धिविनायक मंदिर हॉल मरोळ पाइप लाईन अंधेरी पूर्व येथे 'आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड' व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले.

या शिबिरात अनेक स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतलाज्यामुळे एकूण ३८० स्थानिकांना शिबिराचा लाभ घेता आला.

या उपक्रमाची विनंती माजी नगर सेवक श्री. सुभाष कांता सावंत यांच्या विनंतीनुसार झाली. अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनने 'आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड' व मोफत नेत्र तपासणी या शिबिरांचे यशस्वी आयोजन केले.

केंद्र शासनाच्या आभा कार्डात लाभार्त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते व क्युअर कोड स्कॅन केल्याने पुनः प्राप्त करता येते.केंद्र शासनाचे आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून  पण वापर करता येते.

आभा कार्ड हे केंद्र सरकारचे एक ओळखपत्र आहे जे भविष्यातील सर्व सेवांसाठी आवश्यक आहे. मेश्राम फाऊंडेशनचे प्रतिभावान अध्यक्षश्री. अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, "समाजाच्या सर्वांगातील दुर्बल घटकांना पर्यन्त विनामूल्य सेवा देणे हेच त्यांचे उद्दीष्ट आहे.

ही सेवा अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन हे नियमित पणे विविध ठिकाणी आणि विविध राजकीय पक्षा सोबत  अश्या प्रकारचे सामाजिक उपक्रम स्व कमाईतून राबवत असतात.

मेश्राम फाऊंडेशन हे नियमित समाजकारणात सक्रिय असून, ते शिक्षण, रोजगार, आरोग्य महिला सक्षमी करणासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची आयोजन करत असते. 

राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री. एकनाथ शिंदे यांनी मेश्राम फाऊंडेशनच्या अविरत समाजकारणाचे कौतुक करत फाऊंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.

सदर शिबिराची संकल्पना आणि आयोजन फाऊंडेशनचे अनुभवी कर्तबगार जनसंपर्क अधिकारी श्री. विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली जेणेकरून सदर शिबिर अत्यंत यशस्वी  रित्या  पार पडले.


Comments

Popular posts from this blog

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे ई-श्रम व मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न.

मेश्राम फौंडेशनचे मेगा ‘आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड शिबीर नटराज हॉल, चकाला (अंधेरी पूर्व) येथे संपन्न.

अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे चिखलवाडी येथे आभा कार्ड शिबीर संपन्न