मेश्राम फौंडेशनचे परळ मठ येथे भव्य आभा व नेत्र तपासणी शिबीर संपन्न
मुंबई: दिनांक १२.१०.२०२३ रोजी अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्यावतीने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ (परळ मठ) येथे मोफत आयुष्मान भारत आरोग्य कार्ड व नेत्र तपासणी शिबिर राबविण्यात आले होते.
श्री सचिन शेटये, विश्वस्त,
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या
विनंतीनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने सदर शिबीर परळ मठ येथे राबिवले.
स्थानिक रहिवाशांच्या प्रचंड प्रतिसादात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
ज्यात २५० हून अधिक होतकरू लोकांनी शिबिराचे
लाभ घेतले. मेश्राम फाऊंडेशनतर्फे सदर शिबिर आयोजित करून गोरगरिबांना मोफत सेवा
देण्यात आली.
आभा कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली योजना
अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख आहे.मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमितपणे नेत्र
तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे मोफत नेत्रतपासणी नागरिकांसाठी उपयुक्त
ठरली.
अश्विन मलिक मेश्राम नियमितपणे मुंबई विभागात विविध ठिकाणी शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात मोफत सेवा देतात.
संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत केंद्र शासनाच्या अश्या
योजना वेळोवेळी निशुल्क प्रदान करणे, हे आमच्या फाउंडेशनचे ध्येय आहे.
ही सेवा श्री. अश्विन मलिक मेश्राम हे नियमित पणे विविध ठिकाणी आणि विविध
राजकीय पक्षासोबत अश्या प्रकारचे सामाजिक
उपक्रम आपल्या स्व - कमाईतून राबवत असतात.
श्री सचिन शेटये व श्री स्वामी
समर्थ सेवा मंडळाचे पदाधिकारी या शिबिरास सहभाग घेतला व मेश्राम फाऊंडेशनच्या
निरंतर होणाऱ्या उत्कृष्ट कामाचे मनसोक्त कौतुक करून भविष्यात परळ मठ या भागात
पुढील शिबिरे राबविण्यास विनंती केली.
मेश्राम फाऊंडेशनचे अनुभवी कार्यक्षम जनसंपर्क अधिकारी श्री. विजय डोईफोडे
यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे
यशस्वी आयोजन करण्यात आले.
.jpeg)
.jpeg)





Comments
Post a Comment