मेश्राम फौंडेशनचे इंदिरा नगर मरोळ पाइप लाईन अंधेरी पूर्व येथे भव्य आभा कार्ड व नेत्र तपासणी शिबीर संपन्न
मुंबई: मेश्राम फाऊंडेशनने दिनांक १७.१०.२०२३ रोजी इंदिरा नगर मरोळ पाइप लाईन अंधेरी पूर्व येथे 'आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड' व मोफत
नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
होते.
या शिबिरात अनेक स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, ज्यामुळे एकूण ३५०+ स्थानिकांनी शिबिराचा लाभ घेता आला.
या शिबिराची विनंती रितेश कमलेश राय, शाखाप्रमुख यांच्या यांच्या कडून करण्यात
आली व मेश्राम फाऊंडेशनने 'आयुष्यमान
भारत हेल्थ कार्ड' व मोफत नेत्र तपासणी सदर शिबिरांचे यशस्वीरित्या आयोजन केले. मधुमेह
असलेल्या रुग्णांनी नियमितपणे नेत्र तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे मोफत नेत्रतपासणी नागरिकांसाठी
उपयुक्त ठरली.
केंद्र शासनाच्या आभा कार्डात लाभार्त्याची संपूर्ण
वैद्यकीय माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित असते व क्युअर कोड स्कॅन केल्याने पुनः
प्राप्त करता येते. केंद्र शासनाचे आभा कार्ड हे ओळखपत्र म्हणून पण वापर करता येते.
आभा कार्ड हे केंद्र
सरकारचे एक ओळखपत्र आहे जे भविष्यातील सर्व सेवांसाठी आवश्यक आहे. मेश्राम
फाऊंडेशनचे उदयमी अध्यक्ष, श्री. अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, "समाजाच्या
सर्वांगातील दुर्बल घटकांना पर्यन्त विनामूल्य
सेवा देणे हेच त्यांचे उद्दीष्ट आहे”.
आभा कार्ड ही पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली योजना अत्यंत
लोकप्रिय व लोकाभिमुख आहे. मेश्राम फाऊंडेशन अश्या
प्रकारचे शिबिरे नियमित पणे मुंबईच्या विविध ठिकाणी विविध राजकीय पक्षासोबत अश्या प्रकारचे सामाजिक उपक्रम स्व कमाईतून राबवत असतात.
मेश्राम फाऊंडेशन हे नियमित समाजकारणात सक्रिय असून, ते शिक्षण, रोजगार, आरोग्य व महिला सक्षमी करणासाठी वेगवेगळ्या केंद्र शासनाच्या योजना आयोजित करीत असतात.
राज्याचे मुख्यमंत्री
माननीय नामदार श्री. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अनेक वेळा मेश्राम
फाऊंडेशनच्या अविरत समाजकारणाचे कौतुक
करत फाऊंडेशनच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या. शिवसेनेचे उपनेते श्री कमलेश राय यांनी मेश्राम फाऊंडेशनच्या
उल्लेखनीय कार्याची स्तुति करत पुढील शिबिराची मागणी फाऊंडेशनला केली आहे.
सदर शिबिराची संकल्पना आणि आयोजन फाऊंडेशनचे अनुभवी व तडफदार जनसंपर्क अधिकारी श्री. विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली जेणेकरून
सदर शिबिर अत्यंत यशस्वी रित्या पार पडले.
.jpeg)

.jpeg)


.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment