अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनचे MIDC अंधरी पूर्व येथे भव्य आभा शिबीर संपन्न
मुंबई: दिनांक ०७.१०.२०२३ अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्यावतीने जीवन ज्योत प्रतिष्ठान कार्यालय MIDC अंधरी पूर्व येथे मोफत आयुष्मान भारत आरोग्य कार्ड करण्यात आले होते.
भाजपचे अंधेरी (पूर्व) निवडणूक प्रमुख व जीवन ज्योत प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री. मुरजी पटेल (काका) यांच्या विनंतीनुसार अश्विन मलिक मेश्राम फौंडेशनने सदर शिबीर MIDC अंधरी पूर्व येथे राबिवले. स्थानिक रहिवाशांच्या प्रचंड प्रतिसादात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात ३५० हून अधिक लोक या शिबिराचे लाभार्थी ठरले. श्री. मुरजी पटेल (काका) साठी अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे सदर शिबिर आयोजित करून गोरगरिबांना मोफत सेवा देण्यात आली.
आभा कार्ड ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली योजना
अत्यंत लोकप्रिय व लोकाभिमुख आहे.
अश्विन मलिक मेश्राम नियमितपणे मुंबई विभागात विविध ठिकाणी शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात मोफत सेवा देतात.
संस्थापक अध्यक्ष अश्विन मलिक मेश्राम यांच्या मते, समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत केंद्र शासनाच्या अश्या योजना वेळोवेळी निशुल्क प्रदान करणे, हे आमच्या फाउंडेशनचे ध्येय आहे.
ही
सेवा श्री. अश्विन मलिक मेश्राम हे नियमित पणे विविध ठिकाणी आणि
विविध राजकीय पक्षासोबत अश्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आपल्या स्व - कमाईतून
राबवत असतात.
श्री. मुरजी पटेल (काका) यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा या शिबिरास भाग घेतला व अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनच्या निरंतर होणाऱ्या उत्कृष्ट कामाचे मनसोक्त कौतुक करून भविष्यात MIDC अंधरी पूर्व भागात पुढील शिबिरे राबविण्यास विनंती केली.
अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनचे अनुभवी कार्यक्षम जनसंपर्क अधिकारी श्री. विजय डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
.jpeg)




.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment